Shruti Vilas Kadam
दूध, दही, पनीर यांसारखी डेअरी उत्पादने प्रथिने आणि कॅल्शियमने समृद्ध असतात, जी मुलांच्या वजन वाढीसाठी फायदेशीर आहेत.
अंडी प्रथिने आणि कॅलोरींचा उत्तम स्रोत आहेत. दररोज एक उकडलेले अंडे देणे मुलांच्या वजन वाढीस मदत करू शकते.
केळी वजन वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. मुलांना केळी अशीच खाऊ घालू शकता किंवा दूधात मिसळून शेक तयार करून देऊ शकता.
बदाम, अक्रोड, काजू आणि विविध बिया प्रथिने, हेल्दी फॅट्स आणि इतर पोषक तत्वांनी भरलेले असतात, जे वजन वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.
डाळीमध्ये प्रथिने आणि इतर पोषक तत्वे असतात. मुलांना डाळीत चपाती भिजवून किंवा तूप लावून खाऊ घालणे फायदेशीर ठरते.
ओट्समध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. मुलांना ओट्स बनवून खाऊ घालणे त्यांच्या वजन वाढीस मदत करू शकते.
शुद्ध तूप कॅलोरी आणि हेल्दी फॅट्सने भरलेले असते. मुलांच्या आहारात शुद्ध तूपाचा समावेश केल्याने वजन वाढवण्यास मदत होते.