Tanvi Pol
लहान मुलं खेळायला बाहेर जाताना प्रत्येक पालक चिंतेने त्यांना खूप पाणी पाजतात.
मात्र, एकदम जास्त पाणी प्यायल्यास त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो.
लहान मुलांना जास्त पाणी पाजल्याने पोट फुगणे, मळमळ, उलटीसारखी लक्षणं दिसू शकतात.
जास्त पाणी पिल्यास इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल बिघडतो.
खेळताना मुले घाम गाळतात, त्यानुसार त्यांना थोडं-थोडं करून पाणी द्यावं.
विशेषत उन्हाळ्यात आणि दम लागणाऱ्या खेळांदरम्यान पाण्याचं योग्य प्रमाण महत्त्वाचं असतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.