Dhanshri Shintre
प्रवासाची आवड असेल, तर चिखलदरा हे महाराष्ट्रातील निसर्गरम्य हिल स्टेशन तुमच्या यादीत नक्की असावे, तेथील सौंदर्य मन मोहवणारे आहे.
अमरावती जिल्ह्यातील हे आकर्षक हिल स्टेशन त्याच्या निसर्गसंपन्न हिरवाईसाठी, आल्हाददायक हवामानासाठी आणि शांत, रम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
जळगावपासून सुमारे २८४ किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक दूरवरून निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी भेट देतात.
शांतता आणि साहस यांचा समतोल अनुभव घ्यायचा असेल, तर निसर्गाच्या सान्निध्यातील हे ठिकाण तुमच्यासाठी एक अद्वितीय पर्याय ठरू शकतो.
हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून सुमारे ११८८ फूट उंचीवर वसलेले असून त्याचे हवामान आल्हाददायक असते.
येथील नागमोडी डोंगरी रस्त्यांवरून प्रवास करताना तुमच्या नजरेस भुरळ घालणारी निसर्गदृश्ये दिसून येतील.
महाराष्ट्रात सहल करण्याची योजना असेल, तर चिखलदरा हे हिल स्टेशन तुमच्या यादीत नक्की सामाविष्ट करा.