Surabhi Jayashree Jagdish
आपल्यापैकी अनेकजण चिया सिड्सचं सेवन करतात. स्मूदी, पुडिंग आणि हेल्दी बाउल्समध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पचन सुधारणा आणि वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर मानले जातात. मात्र काहींनी याचं सेवन टाळलं पाहिजे.
ज्यांचा रक्तदाब आधीच कमी असतो त्यांनी चिया सीड्सचं सेवन टाळलं पाहिजे. यामध्ये असलेले घटक रक्तदाब आणखी कमी करू शकतात. यामुळे चक्कर येणं किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं. हे रक्तदाब कमी करण्याचं काम करतं. म्हणूनच लो बीपी असणाऱ्यांसाठी ते धोकादायक ठरू शकते.
ज्यांना गॅस, अॅसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास आहे त्यांनी काळजी घ्यावी. चिया सीड्समध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असते. यामुळे पोटातील त्रास अधिक वाढू शकतो.
फायबर शरीरासाठी चांगलं असलं तरी जास्त प्रमाणात घेतल्यास त्रास होतो. चिया सीड्स जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोट फुगणं किंवा अपचन होऊ शकतं. म्हणून मर्यादेतच सेवन करणं महत्त्वाचं आहे.
किडनीशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी चिया सीड्स टाळावेत. यामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस असतो. हे घटक किडनीवर अतिरिक्त ताण देऊ शकतात.
ज्यांना बिया किंवा सीड्सची अॅलर्जी आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. चिया सीड्स खाल्ल्याने एलर्जिक रिअॅक्शन होऊ शकतं. यामध्ये खाज, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो
काही लोकांना चिया सीड्स पचत नाहीत. यामुळे उलटी, मळमळ किंवा जुलाब होऊ शकतात. अशी लक्षणं दिसल्यास चिया सिड्स खाऊ नयेत.