कोमल दामुद्रे
चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा-३ बी कॉम्प्लेस्क्स, व्हिटॅमिन सी, ई आणि ए सारखे अनेक फायदे मिळतात.
लहान काळ्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर यांचे प्रमाण जास्ती असते त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते
चिया सीड्सचे आरोग्याला अनेक फायदे असले तरी या लोकांनी चुकूनही त्याचे सेवन करु नका.
ज्या लोकांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी चिया सीड्सचे सेवन टाळावे. पोटदुखी, सूज, पेटके यासारख्या समस्या उद्भवू शकता.
काही लोकांना चिया सीड्समुळे ऍलर्जी होऊ शकते. हे खाल्ल्यामुळे पुरळ किंवा इतर समस्या दिसली तर खाऊ नका.
जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत असाल तर चिया सीड्स खाऊ नका.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी चिया सीड्स फायदेशीर आहे. कमी रक्तातील साखर असलेल्या लोकांनी खाऊ नये.