ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यात गडकिल्ल्यांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
बेळगावचा राजहंसगड हादेखील ऐतिहासिक वारश्याचा उत्तम नमुना आहे.
रट्ट घराण्याने राजहंसगड किल्ला बांधला होता.
सोलापूर आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर हा किल्ला आहे.
बेळगाव या बाजारपेठेच्या शहराचे रक्षण करण्यासाठी हा बेळगावचा किल्ला बांधण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याकडील पोर्तुगीज व कोकणातील जंजिर्याच्या फौजांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला होता.
राजहंसगडावर २०२३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ५२ फूट उंच पुतळा बसवण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा खूप मोठा आहे. हा पुतळा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहे.