छत्रपती संभाजी महाराज यांना किती भाषा अवगत होत्या?

Surabhi Jayashree Jagdish

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदरमध्ये झाला.

उत्तम साहित्यिक

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे हे छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते.

लिहिलेले ग्रंथ

छत्रपती संभाजी महाराज यांनी नायिकाभेद, नखशीख तसंच सातसतक अशा ग्रंथांचं लिखाण केल्याची माहिती आहे.

बुधभूषण

संभाजी महाराज यांनी वयाच्या १७व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथही लिहिला होता.

किती भाषा

पण तुम्हाला माहितीये का संभाजी महाराज यांना एकूण किती भाषा येत होत्या?

अनेक भाषा

स्वराज्याचे हे दुसरे अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराज हे मराठीसह संस्कृत, फारसी, उर्दु, अरबी, ब्रज, इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे जाणकार होते.

इंग्रजी

छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजीमधून अनेकदा फिरंग्यांशी बोलणी आणि पत्रव्यवहार केला.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

Chhatrapati Shivaji Maharaj | saam tv
येथे क्लिक करा