ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटाचे नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
छगन भुजबळ हे राज्याच्या राजकारणातील मोठं नाव आहे. त्यांना मंत्रिपद दिले नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.
दरम्यान, आज सकाळी ९ वाजता छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा या खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते.
२०२४नुसार, छगन भुजबळ यांच्याकडे ११ कोटी २० लाख ४१ हजार रुपयांची मालमत्ता आहे.
छगन भुजबळांच्या पत्नीच्या नावावर १६ कोटी ५३ लाख रुपयांची मालमत्ता आहे.
छगन भुजबळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर २७.७३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर ४४ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज आहे.