Chetan Bodke
कडुलिंब एक औषधी वनस्पती आहे. कडुलिंबच्या पाल्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
आयुर्वेदात कडुलिंबाला विशेष महत्त्व आहे. कडुलिंबाचा उपयोग स्किन केअरसाठी तर कडुलिंबाच्या काड्यांचा वापर दात साफ करण्यासाठी केला जातो.
आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील अनेक आजार बरे होतात.
सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे पाने खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
कडुलिंबाच्या पानामुळे बॉडी तर डिटॉक्स होते, त्यासोबतच शरीरातील रक्तही शुद्ध होते. सोबतच, अनेक आजारांसाठी कडुलिंब महत्वाचा आहे.
कडुलिंबाचा पाला चेहऱ्याच्या स्किनसाठी आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या पानांचा ज्युस प्यायल्याने, ॲसिडिटी आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.
कडुलिंबाच्या पानामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
जर तुम्हाला सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून सुटका मिळवायची असेल तर, कडुलिंबाचे पानं फायदेशीर ठरतात.
तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा त्याची चटणी बनवून तुम्ही जेवणासोबतही खावू शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.