Shreya Maskar
पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला झटपट चीजी नूडल्स बनवा.
चीजी नूडल्स बनवण्यासाठी नूडल्स, बटर, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची, आले, मीठ, नूडल्स मसाला, कोथिंबीर, पाणी आणि चीज इत्यादी साहित्य लागते.
साहित्य नूडल्स बनवण्यासाठी पॅनमध्ये बटर गरम करून त्यात आले, हिरवी मिरची घालून परतून घ्या.
या मिश्रणात कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, नूडल्स मसाला आणि मीठ घालून नीट परता.
यानंतर मिश्रणात पाणी ओतून छान उकळी काढून घ्या.
पाणी उकळल्यानंतर त्यात नूडल्स घालून शिजू द्या.
शेवटी नूडल्सवर भरभरून चीज आणि कोथिंबीर घाला.
तुम्ही यात चिली फ्लेक्स, आवडीचा सॉस देखील टाकू शकता.