Manasvi Choudhary
दरवर्षी लाखो भाविक चारधाम यात्रेला भेट देतात. चारधाम यात्रा ही सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. चारधाम यात्रा उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालयात असते. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र स्थळांचा समावेश असतो.
चारधाम यात्रेला जाणाऱ्यांसाठी प्रशासनाने काही नियम घातले आहेत. डोंगराळभाग, कठिण रस्ते आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन प्रशासनाने मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अनिवार्य केले आहे.
तुमच्या हेल्थ सर्टिफिकेटशिवाय कोणत्याही भाविकांना यात्रेसाठी प्रवेश मिळणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे.
तुम्हाला देखील चारधाम यात्रेला भेट द्यायची असेल तर नियम आणि हेल्थ सर्टिफिकेट बनवण्याची प्रोसेस समजून घ्या.
चार धाम हे ठिकाण उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालयात 3000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असते. यामुळे येथे ऑक्सिजनची पातळी कमी असते. हवामानात देखील बदल होतो ज्यामुळे पर्यटकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
चारधाम यात्रेसाठी तुम्ही ऑनलाइन व ऑफलाईन नोदंणी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान स्वत:चे आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
नियमांनुसार, वैद्यकीय सल्ल्यानुसार फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे. हे सर्टिफिकेट प्रवासाच्या किमान एक महिना आधी तयार केलेले असावे त्यावर स्थानिक डॉक्टराची सही असणे अनिवार्य आहे.
तुम्ही जवळच्या सरकारी किंवा खासगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करू शकता. हृदयाचे ठोके,ऑक्सिजनची पातळी, शुगर आणि रक्तदाब या तपासण्या कराव्यात.