Shreya Maskar
आपल्या रोजच्या आहारातील पदार्थ देखील ॲसिडीटीला कारणीभूत ठरतात. त्यामुळे हेल्दी आहार घ्यावा. तसेच प्रत्येक पदार्थाचे प्रमाण निश्चित करावे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भातापेक्षा चपातीमुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता सामान्यतः जास्त असते. गव्हाच्या पिठात फायबर आणि कॉम्प्लेक्स ग्लूटेन प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो. पोटात जास्त वेळ राहिल्यामुळे ॲसिडची निर्मिती वाढू शकते.
पांढऱ्या भातामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते, तो लवकर पचतो आणि पोटासाठी खूप सौम्य असतो. भातामुळे शरीराला ओलावा मिळतो.
गव्हाचा सौम्य आम्लधर्मी pH, ग्लूटेनचे उच्च प्रमाण आणि दाट फायबर यामुळे चपाती ॲसिडिटीला कारणीभूत ठरू शकते, कारण हे घटक पचनक्रिया मंदावतात. पोट फुगणे, आम्लपित्त वाढणे आणि छातीत जळजळ होते.
गव्हामध्ये अधिक ग्लूटेन प्रथिने असतात, जी आतड्याच्या अस्तराला त्रास देऊ शकतात, सूज निर्माण करू शकतात आणि पचनक्रिया मंदावू शकतात, ज्यामुळे गॅस अडकून राहतो आणि ॲसिडीटी होते.
तुमच्या शरीराला हाय फायबरची सवय नसेल, तर अचानक वाढलेल्या फायबरमुळे गॅस आणि पोट फुगणे ही समस्या होऊ शकते.
करपलेल्या किंवा जळलेल्या चपात्या खाल्ल्याने ॲसिडीटीचे प्रमाण वाढते. पोटाला ते पचवणे खूप कठीण जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.