Shreya Maskar
मळमळ आणि उलट्या थांबवण्यासाठी आले हा एक नैसर्गिक उपाय आहे. त्यातील दाहशामक (anti-inflammatory) गुणधर्म पोटाच्या अस्तरांना आराम देतात आणि पचनास मदत करतात. कच्च्या आल्याचा छोटा तुकडा चावून खा.
साधे, साखर न घातलेले थंड दूध नैसर्गिक अँटासिड म्हणून काम करते. त्यातील भरपूर कॅल्शियम ॲसिडची निर्मिती रोखते आणि अन्ननलिकेवर संरक्षक थर तयार करून जळजळ कमी करते आणि उलट्या थांबतात.
तुळशीची पाने शरीराला थंडावा देतात. तुळशीची पाने पोटातील नैसर्गिक श्लेष्मा (म्युकस) वाढवण्यास मदत करतात. हा म्युकस पोटाच्या आतील भागावर एक संरक्षक थर तयार करतो, ज्यामुळे ॲसिडिटी, गॅस आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.४ ते ५ ताजी धुतलेली पाने चावून खा.
नारळाच्या पाणी भरपूर हायड्रेटिंग आणि इलेक्ट्रोलाइट्सने परिपूर्ण असते. हे पाणी पोटातील पीएच (pH) संतुलित ठेवण्यास आणि तीव्र आम्ल (ॲसिड) सौम्य करण्यास मदत करते.
वारंवार उलट्या होत असतील तर एक चमचा बडीशेप चावल्याने किंवा बडीशेपचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाला आराम मिळतो.
पुदिन्यामध्ये नैसर्गिक अँटिस्पास्मोडिक (आकुंचनरोधक) घटक असतात, जे पोटाच्या स्नायूंना आराम देतात आणि उलट्या थांबतात.
उलटीत होत असल्यास एकाच वेळी ग्लासभर पाणी पिणे टाळा, कारण यामुळे अधिक उलट्या होऊ शकतात. साध्या पाण्याचे छोटे छोटे घोट प्या. यामुळे पोटाला आराम मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.