Acidity : तुम्हाला वारंवार ॲसिडीटीचा त्रास होतोय? 'ही' ५ फळे चुकूनही खाऊ नका

Shreya Maskar

द्राक्षे

द्राक्षांमध्ये ऑक्सलेट्स (Oxalates) असतात, जे शरीराच्या चयापचय क्रियेवर परिणाम करतात, तुमच्या पोटाच्या पीएचवर परिणाम करतात आणि आम्लपित्त वाढवतात.

Grapes | pinterest

अननस

अननसामधील सायट्रिक ॲसिडमुळे पोटाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. अननस खाल्ल्याने पोटातील ॲसिडची पातळी वाढते आणि गॅसची समस्या उद्भवते.

Pineapple | pinterest

संत्री

संत्र्यांमध्येही सायट्रिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे छातीत जळजळ होते आणि पोट दुखी वाढते. तुम्हाला पोटाचे विकार असल्यास संत्र्यांचे सेवन मर्यादित करा.

Oranges | pinterest

लिंबू

लिंबूचे सेवन मर्यादित करावे, कारण यात सायट्रिक ॲसिड असते, जे ॲसिडीटीला कारणीभूत ठरते. रिकाम्या पोटी लिंबू सरबत प्यायलात तर पोटातील ॲसिडीचे प्रमाण वाढते.

Lemon | pinterest

कच्चा पेरू

कच्चा पेरू खाल्ल्याने पचनक्रियेत अडथळा येतो. बियांसहित पेरू खाल्ल्याने पोट फुगू शकते. संवेदनशील पोट असणाऱ्या व्यक्तींनी किंवा गॅस्ट्रायटिसचा त्रास लोकांनी कच्चा पेरू खाणे टाळा.

Raw Guava | pinterest

डाळिंब

डाळिंब गोड-आंबट असते. यामध्ये सायट्रिक ॲसिड आणि टॅनिक ॲसिडसारखे घटक असतात, ज्यामुळे पोटात गॅस्ट्रिक ॲसिड वाढू शकते.

Pomegranate | pinterest

कोणती फळे खावी ?

ॲसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी लिंबूवर्गीय नसलेल्या आणि कमी आम्लयुक्त फळांचा आहारात समावेश करावा. ज्यामध्ये जास्त पाणी आणि फायबर आहे, अशी फळे खावी. उदा. सफरचंद , केळ

apples | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : चहा-कॉफी प्यायल्यावर ॲसिडीटी होते? रेसिपी बनवताना टाका 'हा' एक पदार्थ, पोटात गॅस होणारच नाही

Acidity | pinterest
येथे क्लिक करा...