Shreya Maskar
वेलचीमधील सुगंधी तेलं पोटातील पाचक रसांचे आणि लाळेचे प्रमाण वाढवतात. ज्यामुळे खाल्लेले अन्न लवकर पचते आणि ॲसिडिटी होत नाही.
दालचिनी पोटातील पाचक एन्झाईम्स (Digestive enzymes) उत्तेजित करते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित आणि लवकर पचते. गॅस आणि पोटात जळजळ होत नाही.
तुळशीमध्ये युजेनॉल (Eugenol) हा सक्रिय घटक असतो, जो जठरांत्रातील दाह कमी करतो. जे अडकलेला वायू मोकळा करून आम्लपित्त टाळतात. यामुळे चहामध्ये तुळशीची ३-४ पाने टाका.
हळद आम्लता कमी करते आणिअपचन दूर करते. हळद दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे. जे गॅस्ट्रिक ॲसिडचे उत्पादन नियंत्रित करते आणि पचन सुरळीत करते.
पुदिन्याची पाने आम्लता कमी करतात. मेन्थॉल आणि सक्रिय नैसर्गिक तेलामुळे अपचनाची समस्या उद्भवत नाही. मळमळ किंवा उलट्या होत असतील, तर पुदिन्याचा चहा पिऊन बघा.
लवंगामधील सक्रिय संयुग, युजेनॉलद्वारे आम्लता कमी करते, ज्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे छातीत जळजळ होत असल्यास आराम मिळतो.
पचनसंस्थेला आराम देऊन आणि अतिरिक्त वायू बाहेर काढून आम्लता कमी करते. पोट फुगणे आणि पचनाच्या समस्या दूर होतात. हा चहा रिकाम्या पोटी प्यावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.