Acidity : सकाळी उठल्यावर आंबट ढेकर येतात? रिकाम्या पोटी खा 'हा' एक पदार्थ, ॲसिडीटीवर मिनिटांत मिळेल आराम

Shreya Maskar

भिजवलेले बदाम

रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने ॲसिडीटीपासून आराम मिळतो. दररोज ४ ते ५ भिजवलेले बदाम चावून खाल्ल्याने पोट हलके राहण्यास आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते.बदामामध्ये नैसर्गिक तेल आणि फायबर असतात, जे पोटातील ॲसिड घशात वर येण्यापासून आणि ढेकर येण्यापासून रोखतात.

Soaked Almonds | pinterest

बडीशेपचे पाणी

एक चमचा बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून आणि सकाळी गाळून, ते पाणी प्यायल्याने पोटातील जळजळ आणि ढेकर कमी होतात. बडीशेपमध्ये ॲसिड-विरोधी गुणधर्म असतात, त्यामुळे ते पोटाला थंडावा देते.

Fennel Seed Water | pinterest

पपई

आयुर्वेदानुसार, पपई शरीरातील पित्त दोष संतुलित करते, जो ॲसिडिटीचे एक प्रमुख कारण आहे. सकाळी पपईचे तुकडे खाल्ल्याने केवळ ॲसिडिटीपासून आराम मिळत नाही, तर बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांमध्येही मदत होते.

Papaya | pinterest

ओट्स

हलका, फायबरयुक्त ओट्सचा नाश्ता ॲसिडिटी कमी करण्यास मदत करतो.ओट्समधील फायबर पोटातील अतिरिक्त आम्ल शोषून घेते आणि पोटाला आराम देते. ओट्स दुधात शिजवून काही बिया आणि फळांसोबत खा.

Oats | pinterest

नारळाचे पाणी

नारळाचे पाणी शरीरातील पीएच पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास नारळाचे पाणी प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि छातीत होणारी जळजळ कमी होते.

Coconut Water | pinterest

आवळा किंवा आले

पोटातील ॲसिड नियंत्रित करण्यासाठी सकाळी एक चमचा आवळ्याचा रस प्या किंवा आल्याचा चहा प्या, कारण आल्यामध्ये 'जिंजरॉल' (gingerol) असते, जे नैसर्गिकरित्या पोटातील आम्ल कमी करण्यास मदत करते.

Amla or Ginger | pinterest

बेकिंग सोडा

पोटातील अतिरिक्त आम्ल कमी करण्यासाठी एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळून प्या.

Baking Soda | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर न विसरता खा 'हा' एक पदार्थ, कधी होणार नाही ॲसिडीटी

Acidity | pinterest
येथे क्लिक करा...