Puffed Chapati Tricks: चपाती तव्यावर नीट शेकत नाही? लगेचच वातड होते? मग ही भन्नाट टिप ठरेल बेस्ट

Sakshi Sunil Jadhav

गरम पाणी वापरा

थंड पाण्याऐवजी कोमट किंवा गरम पाणी वापरल्यास कणिक जास्त मऊ होतं. यामुळे चपातीला लवचिकपणा मिळतो आणि तव्यावर ती सहज फुगते.

Puffed Chapati Tricks

पीठ १५ मिनिटं झाकून ठेवा

पीठ मळून झाल्यावर ते लगेच लाटू नका. त्याऐवजी ते ओल्या कपड्याने झाकून ठेवा. यामुळे ग्लूटेन तयार होऊन चपाती मऊ बनते.

Puffed Chapati Tricks

चपाती लाटताना समान जाडी ठेवा

जाड लाटल्यावर चपाती नीट फुगत नाही. हलकी आणि समान जाडीची चपाती लाटल्याने तव्यावर चांगली फुगते.

Puffed Chapati Tricks

तवा योग्य तापमानावर ठेवा

तवा खूप थंड किंवा खूप गरम नसावा. मध्यम आचेवर तवा ठेवून चपाती शेकवल्यास ती नीट फुगते.

Puffed Chapati Tricks

चपाती उलटताना वेळेचे भान ठेवा

पहिल्या बाजूला फक्त ५ ते ७ सेकंद ठेवा आणि लगेच पलटवा. दुसऱ्या बाजूला तपकिरी डाग आले की पुन्हा पलटून हलक्या हाताने दाबा.

Puffed Chapati Tricks

थोडं तेल किंवा तूप वापरा

चपाती भाजून झाल्यावर त्यावर हलकं तूप लावल्यास ती दीर्घकाळ मऊ राहते आणि सुगंधही छान येतो.

Puffed Chapati Tricks

चिमटा वापरा

शेवटी चपाती तव्यावर ठेवून हलक्या हाताने दाबल्यास ती टम्म फुगते आणि मऊ राहते.

Puffed Chapati Tricks

NEXT: या ५ ठिकाणी माणसाने कधीच पाऊल ठेवू नये, नाहीतर इज्जतीला लागेल कलंक

human behavior
येथे क्लिक करा