उरलेल्या चपाती फेकू नका! बनवा चटपटीत पदार्थ, न खाणारेही चाटून पुसून खातील

Manasvi Choudhary

चपातीपासून नवीन रेसिपी

घरात चपाती किंवा पोळी उरली असेल तर ती फेकून देण्याऐवजी तुम्ही एक चटपटीत आणि चविष्ट रेसिपी करा.

chapati | yandex

चटपटीत फ्रॅन्की

लहानमुलांसाठी तुम्ही नाश्त्याला ही रेसिपी ट्राय करू शकता. उरलेल्या चपातीपासून तुम्ही झटपट आणि चटपटीत फ्रॅन्की बनवा.

Leftover Chapati Recipe

साहित्य

चपातीची फ्रॅन्की बनवण्यासाठी चपाती, बटाटे, कांदा, सिमला मिरची, आले- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, गरम मसाला, चाट मसाला, हळद, टोमॅटो, शेजवान चटणा, बटर, मीठ हे साहित्य करा.

Leftover Chapati Recipe | yandex

बटाट्याची भाजी करा

फ्रॅन्की बनवण्यासाठी सर्वातआधी बटाट्याची मसालेदार भाजी बनवून घ्या.

Red Potato Bhaji

चपातीला सॉस लावा

गॅसवर बटर लावून चपाती हलकीशी भाजून घ्या. त्यानंतर भाजलेल्या चपातीवर टोमॅटो सॉस, शेजवान चटणी लावा.

Leftover Chapati Recipe |

फ्रॅन्की रोल तयार करा

भाजलेल्या चपातीवर तयार केलेली मसालेदार बटाट्याची भाजी लांबट आकारात ठेवा. त्यावर थोडा कच्चा कांदा बारीक करून टाका आणि चाट मसाला किंवा जिरा पावडर टाका. त्यानंतर चपातीचा रोल करा.

Leftover Chapati Recipe

क्रिस्पी होण्यासाठी फ्रॅन्की भाजून घ्या

गॅसवर तव्यावर बटर लावूनफ्रॅन्कीचा रोल दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

Leftover Chapati Recipe

Next: Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

Ganpati Decoration Ideas
येथे क्लिक करा..