Shreya Maskar
सातारा जिल्ह्यात भुईंजजवळील एकाच डोंगररांगेवर वसलेले चंदन आणि वंदन हे दोन्ही किल्ले 'जुळे किल्ले' म्हणून ओळखले जातात.
चंदन आणि वंदन किल्ले पुणे-सातारा मार्गावर, महाबळेश्वर आणि सातारा यांच्या सीमेवर आहेत.
चंदन आणि वंदन हे किल्ले साताऱ्याकडे जाणारे रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी बांधले गेले होते. ऐतिहासिक किल्ल्याच्या आजूबाजूला दऱ्या, मंदिर , डोंगर पाहायला मिळतात.
चंदन आणि वंदन हे ट्रेकिंगसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. गिर्यारोहणप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहेत.
चंदन आणि वंदन किल्ल्यांचे बांधकाम शिलाहार राजा भोज-द्वितीय यांच्या काळात केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकले होते.
चंदन आणि वंदन किल्ले सह्याद्रीच्या पर्वतरांगेतच आहेत. या किल्ल्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
चंदन आणि वंदन किल्ल्यामध्ये जुन्या वास्तूंचे अवशेष आहेत. असे बोले जात. सुट्टीत या ठिकाणी नक्की फिरण्याचा प्लान करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.