Surabhi Jayashree Jagdish
थोर विद्वान आचार्य चाणक्य यांची धोरणं आजही लोकांच्या जीवनाला दिशा देतात.
चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात स्त्रियांच्या गुणांचा उल्लेख केला आहे. स्त्रियांच्या या गुणांपुढे पुरुषच नव्हे तर संपूर्ण जगही नतमस्तक होतं.
चाणक्य नीतीमध्ये ज्या गुणांचा उल्लेख करण्यात आला आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
अनेक स्त्रिया धाडसाने आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मोठ्या अडचणींवरही सहज मात करतात. अशा वेळी धाडसी स्त्रिया पुरुषांना आकर्षित करतात.
चाणक्य यांचा असा विश्वास होता की, स्त्रिया स्वभावाने दयाळू असतात. दरम्यान त्यांच्या या गुणाला पुरुषांसमोर विशेष स्थान आहे.
स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. एखादी गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी अपयशी ठरतात, तेव्हा स्त्रिया त्यांच्या समजूतदारपणाने त्या समस्यांवर उपाय शोधतात.
चाणक्य नीतीनुसार क्षमा करण्याची प्रवृत्ती असलेल्या स्त्रियांचं मन खूप मोठं असतं. पुरुषांना अशा स्त्रिया फार आवडतात.