Manasvi Choudhary
आयुष्यात सर्वाधिक नुकसान कुठे होत असेल तर ते म्हणजे चुकीच्या व्यक्तीसोबत निर्माण झालेले नातेसंबंध.
शाळा, कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याला असे काही लोक भेटतात ज्याच्याशी आपली मैत्री, नातेसंबंध लवकर होते आणि हे लोक तुम्हाला खूप जवळचे वाटतात.
पण काळ बदलला की त्याचे खरे रूप स्पष्ट होते. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नितीशास्त्रात स्वार्थी व्यक्तींविषयी सांगितले आहे.
चाणक्यांच्यामते, व्यक्तीच्या बाह्यगुणावरून कधीही विश्वास ठेवू नये तर त्याचा मूळ स्वभाव आणि वागणूक समजून घेणे महत्वाचे आहे.
आजकाल, वैयक्तिक आणि व्यवसायिक क्षेत्रात नातेसंबंध लवकर जुळतात आणि तुटतात याचे कारण म्हणजे व्यक्तींचा स्वार्थपणा.
1) अति गोड बोलणे
आचार्य चाणक्याच्या मते. जो व्यक्ती कोणत्याही कारणाशिवाय तुमची स्तुती करतो किंवा तुमच्याशी गोड बोलतो अशा व्यक्तींपासून सावध राहा.
2) इतरांविषयी वाईट बोलणे
चाणक्य नितिनुसार, जो व्यक्ती तुमच्यासमोर सतत इतरांची निंदा करतो त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. असे लोक परिस्थितीनुसार बदलतात.
3) ते एका व्यक्तीबद्दल दुसऱ्या व्यक्तीसमोर वाईट बोलतात आणि मग पहिल्या व्यक्तीबद्दल तिसऱ्य व्यक्तीसमोर वाईट बोलतात.