Dhanshri Shintre
आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट गुप्त ठेवली पाहिजे, कारण त्यानेच यशस्वी होण्यास मदत होते.
चाणक्य नीतीनुसार, जो व्यक्ती भविष्यासाठी योजना तयार करतो, त्याने ती गुप्त ठेवावी, कारण गोपनीयता यशाचे रहस्य आहे.
भविष्यात करण्याची योजना गुप्त ठेवल्यास यश मिळते, कारण गुप्तता टिकवल्याने अडथळे टाळता येतात आणि उद्दिष्ट साध्य होते.
योजना गुप्त ठेवल्यास विरोधक आणि द्वेष करणारे अडथळे आणू शकत नाहीत, त्यामुळे यश मिळण्याची संधी अधिक वाढते.
माणसाने आपले उद्दिष्ट किंवा ध्येय इतरांसोबत शेअर करू नये, कारण यामुळे अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.
लक्ष्य गाठायचं असेल तर शांतपणे आणि गुप्तपणे पुढे जाणं अधिक फायदेशीर ठरतं, अडथळे टाळता येतात.
अशा व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतात, तर शत्रू त्यांच्या यशाकडे फक्त पाहत राहतात आणि काहीही करू शकत नाहीत.