Dhanshri Shintre
आचार्य चाणक्य यांनी जीवनातील यश आणि जग जिंकण्यासाठी काही प्रभावी सवयींचा अभ्यास करण्याची शिफारस केली आहे.
ही सवयी अंगीकारल्यास तुम्हाला कमी वेळात आणि जलद यश मिळवता येईल, असं आचार्य चाणक्य यांचे मत आहे.
नंतर करु असे काम पुढे ढकलण्याची सवय सोडून द्या, कारण सबबी तुम्हाला यशाच्या मार्गावर पुढे जाण्यापासून रोखू शकतात.
वेळ वाया घालवू नका, कारण तो पुन्हा मिळवता येणार नाही.
सूर्योदयापूर्वी उठणे आवश्यक आहे, कारण सकाळी लवकर उठल्यास दिवस अधिक चांगला होतो.
सकाळी सूर्योदयापूर्वी उठल्याने नशीब मिळवता येते, असे मानले जाते आणि यामुळे जीवनात यश मिळवता येते.
चुका करणे नेहमी योग्य नाही. परिपूर्णतेसाठी कामाबद्दल जाणून घ्या आणि इतरांच्या चुकांमधून शिकून प्रगती करा.
आचार्य चाणक्य यांच्या मते, भविष्यासाठी बचत करा आणि अनावश्यक खर्च टाळा, कारण बचत हेच भांडवल आहे.