Sakshi Sunil Jadhav
काही लोक नात्यांमध्येही स्वत:चा फायदा पाहतात. अशा व्यक्तींसमोर आपल्या वैयक्तिक अडचणी सांगितल्यास ते तुमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकतात.
तुमच्याशी स्पर्धा करणाऱ्या किंवा तुमचा विरोध करणाऱ्या व्यक्तीसमोर मनातील दुःख सांगणे टाळा. तुमची अडचण त्यांच्यासाठी तुमच्याविरोधात वापरण्याची संधी ठरू शकते.
ज्या व्यक्ती तुमच्या भावना गांभीर्याने घेत नाहीत, त्यांच्यासमोर वैयक्तिक समस्या मांडणे टाळावे. तुमच्या बोलण्याची इतरांसमोर चर्चा होण्याची शक्यता असते.
काही लोक दुसऱ्यांच्या दुःखालाही मजा किंवा चर्चेचा विषय बनवतात. अशा व्यक्तींसमोर मन मोकळे करण्याऐवजी विश्वासू व्यक्तीची निवड करणे चांगले.
काही व्यक्ती स्वतःच छोट्या समस्यांमुळे अस्वस्थ होतात. त्यांच्यासमोर मोठी अडचण सांगितल्यास त्यांची चिंता आणखी वाढू शकते.
दुःख मनात ठेवणे योग्य नाही, पण प्रत्येक व्यक्तीसमोर ते व्यक्त करणेही शहाणपणाचे नाही. कोणावर किती विश्वास ठेवायचा, हे ठरवणे महत्त्वाचे आहे.
आई-वडील, जीवनसाथी, खरा मित्र, गुरु किंवा तुमच्या हिताचा विचार करणारी व्यक्ती यांच्यासोबत मनातील समस्या शेअर करता येतात. अशा व्यक्ती योग्य सल्ला देऊ शकतात.
चाणक्य नीतीचा अर्थ भावना कायम दडपून ठेवणे असा नाही. उलट, योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीसमोर भावना व्यक्त करणे महत्त्वाचे आहे.
चाणक्य नीतीतील या शिकवणीचा मुख्य उद्देश प्रत्येकावर संशय घेणे नसून, वैयक्तिक माहिती आणि भावनांबाबत योग्य व्यक्तीची निवड करणे हा आहे.