Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे राजनिती, अर्थतज्ज्ञ आणि यशस्वी होण्याच्या मार्ग दाखवणारे गुरू आहेत.
चाणक्यांच्या मते, तुम्ही आयुष्यातल्या खऱ्या आणि चांगल्या माणसांना ओळखलं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचणी येणार नाहीत.
चाणक्य म्हणतात, खरी माणसं ओळखणं हे सोन्याची परिक्षा घेण्याइतकं कठीण असतं. त्यासाठी तुम्हाला ४ गोष्टी लक्षात घेतल्या की ते सोपं होतं.
खरा व्यक्ती तोच असतो जो गरजेच्यावेळी कोणतीही परिक्षा द्यायला तयार होतो.
कितीही लांबचा व्यक्ती असला आणि तो तो स्वार्थीपणा सोडून कोणत्याही क्षणी मदतीला येत असेल तो खरा व्यक्ती असतो.
चाणक्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य त्याच्या वागणुकीवरून, बोलण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतं.
जो व्यक्ती स्वत: चा राग कंट्रोल करतो. त्यांचा सगळेच आदर करतात. कारण त्याचे चरित्र चांगले असते.
कोणाशीही जवळीक साधण्यापूर्वी किंवा विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही या गोष्टींची चाचणी घेणे आवश्यक आहे.