ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आचार्य चाणक्य नेहमी आयुष्य कसं जगायचं हे सांगतात. आयुष्य आणखी सुखी करण्यासाठी काही टीप्स देत असतात.
प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी नाती असतात. प्रत्येक नात्यासाठी आपल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात.
पती-पत्नीने आपले नाते अजून घट्ट करण्यासाठी या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
नात्यात नेहमी प्रेम असायला हवे. प्रेमासोबतच ईमानदारी खूप गरजेचे असते.
वैवाहिक जीवनात आपल्या पार्टनरचा आदर करणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचा आदर कराल तेव्हाच त्याच्या मनात तुमच्याविषयी चांगल्या भावना निर्माण होतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जर नात्यात अहंकाराला जास्त प्राधान्य दिलं तर ते नाते लवकर तुटते.