Shreya Maskar
एक यशस्वी बॉस होण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन, शिस्त , प्लान यांसोबत आणखी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चाणक्या नीतीनुसार बॉस बनण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या ५ गोष्टी जाणून घ्या आणि आतापासून अमलात आणा.
चाणक्याच्या मते, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी इतरांशी त्यावर चर्चा करू नका. एक यशस्वी बॉस तो असतो जो आपली पुढील रणनीती अंमलात आणण्याची योग्य वेळ येईपर्यंत गोष्टी सीक्रेट ठेवतो. यामुळे तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकत नाहीत.
बॉस खूप मवाळ नसावा. चाणक्यांच्या मते, बॉसने जिथे आवश्यक असेल तिथे कठोर व्हावे आणि जिथे शक्य असेल तिथे सौम्यता दाखवा.
एक चांगला बॉस तो असतो जो स्वतःच्या उदाहरणाने हे दाखवून देतो. जर तुम्हाला तुमची टीम वक्तशीर आणि मेहनती हवा असेल, तर तुम्ही आधी ती शिस्त स्वतःच्या जीवनात रूजवली पाहिजे. तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतींमध्ये कोणताही फरक नसावा.
चाणक्य नीतीनुसार, राजाची शक्ती त्याच्या मंत्र्यांमध्ये असते. त्याचप्रमाणे, बॉसचे यश त्याच्या टीमवर अवलंबून असते. लोकांची निवड त्यांच्या कौशल्यांवर आणि सचोटीवर आधारित करा.
खरा बॉस संकटातच ओळखला जातो. जेव्हा एखादा प्रोजेक्ट अयशस्वी होतो किंवा मोठी समस्या उद्भवते, तेव्हा बॉसने घाबरून जाण्याऐवजी शांत राहून त्यावर उपाय शोधला पाहिजे. चाणक्याचा विश्वास होता की केवळ एक संयमी व्यक्तीच मोठ्या मोठ्या अडथळ्यांवर मात करू शकते.
एका चांगल्या व्यावसायिकाची ओळख त्याची चिकाटी, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि भक्कम नैतिक सचोटी यांवरून होते. तसेच जिद्द आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन गरजेचा असतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.