Manasvi Choudhary
भारतीय स्वयंपाकघरात चण्याची डाळ आवडीने खाल्ली जाते. चण्याची डाळ बनवताना ती भिजवून ठेवल्यानंतर अनेकदा आपण त्याचे पाणी फेकून देतो. पण तुम्हाला माहितीये का, चण्याच्या डाळीचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
चण्याच्या डाळीचे पाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
चण्याच्या डाळीच्या पाण्यात भरपूर प्रमाणात प्रथिने , लोह, आणि कर्बोदके असतात. हे पाणी प्यायल्याने शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळते आणि दिवसभर कामाचा थकवा जाणवत नाही.
चण्याच्या डाळीच्या पाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे पाणी अत्यंत गुणकारी ठरते. हे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाही.
चण्याच्या डाळीच्या पाण्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. हे पाणी प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते, वारंवार भूक लागत नाही आणि शरीरातील जास्तीची चरबी घटवण्यास मदत होते.
पोटात गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास हे पाणी फायदेशीर ठरते. यामुळे पचनसंस्था सुधारून पोटाचे विकार दूर होतात.
चण्याच्या डाळीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजद्रव्ये असतात, जी शरीराची प्रतिकारशक्ती बळकट करून विविध संसर्गांपासून संरक्षण करतात.
अर्धी वाटी चण्याची डाळ स्वच्छ धुऊन रात्री एक किंवा दोन ग्लास पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी ते पाणी गाळून तुम्ही रिकाम्या पोटी पिऊ शकता (किंवा चण्याची डाळ उकळताना उरलेले अतिरिक्त पाणी देखील वापरू शकता