Manasvi Choudhary
संध्याकाळी चहासोबत कुरकुरीत पकोडे खायला लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतात.
आज आम्ही तुम्हाला चण्याच्या डाळीची क्रिस्पी भजी कशी बनवायची? ही रेसिपी सांगणार आहोत.
चण्याच्या डाळीची भजी बनवण्यासाठी चणा डाळ, जिरा पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, खाण्याचा सोडा, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद, मसाला, आणि तेल हे साहित्य एकत्र करा.
चणाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात चणाडाळ चार ते पाच तास भिजत घाला.
मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरमध्ये चणाडाळ, हिरवी मिरची, आले, लसूण आणि जिरे टाकून जाडसर वाटून घ्या.
एका प्लेटमध्ये वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, भरपूर कोथिंबीर, हळद, चवीनुसार मीठ आणि ओवा टाका.
गॅसवर कढईत तेल चांगले गरम करा.तेल तापल्यानंतर हाताने किंवा चमच्याने मध्यम आकाराची भजी तेलात सोडा.
भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी भजी तयार होतील.