Shruti Vilas Kadam
चणाडाळ, तांदूळ, हिरवी मिरची, आले, जिरे, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घ्या. चवीसाठी कांदा, कोथिंबीर किंवा मसालेही घालू शकता.
चणाडाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन साधारण ४ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे मिश्रण सहज वाटता येते.
भिजवलेली डाळ आणि तांदूळ पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात आले, हिरवी मिरची, जिरे आणि मीठ घाला.
डोश्याचे पीठ ना खूप घट्ट ना खूप पातळ ठेवावे. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून डोसा सोडण्यासाठी योग्य कन्सिस्टन्सी तयार करा.
नॉनस्टिक किंवा लोखंडी तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. तवा चांगला तापल्यानंतर पीठ गोलाकार पसरवा.
डोश्याच्या कडा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर भाजा. वरून थोडे तेल सोडल्यास डोसा अधिक छान आणि खमंग होतो.
गरमागरम चणाडाळ डोसा नारळाची चटणी, टोमॅटो चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा. नाश्ता किंवा हलके जेवण म्हणून हा उत्तम पर्याय ठरू शकतो.