Siddhi Hande
चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा, असे अनेकजण म्हणतात.
त्यात पावसात गरमागरम कडक चहा प्यायची मज्जा काही वेगळीच असते.
चहामध्ये जर गवतीचहा आणि अदरक किसून टाकलं तर दिवस मस्त जातो.
चहा बनवण्यासाठी सर्वात आधी पाणी उकळायला ठेवा.
या पाण्यात तुम्ही गवती चहा आणि अदरक मस्त उकळून घ्या. जेणेकरुन त्याचा अर्क चहात उतरेल.
यानंतर चहा पावडर आणि साखर टाका.
यानंतर चहा ५ मिनिटे मस्त उकळून घ्या. त्यात वरुन वेलची पावडरदेखील टाकू शकतात.
यानंतर सर्वात शेवटी दूध टाका.
दूध टाकल्यावर फक्त २ मिनिटांतच गॅस बंद करा. दूध टाकल्यावर जास्त वेळ उकळून घेऊ नका नाहीतर चहाला जळाल्याचा वास येईल.
यानंतर मस्तपैकी गरमागरम भजीसोबत चहाचा आस्वाद घ्या.