Ankush Dhavre
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मध्य रेल्वेतर्फे ४ विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कसं असेल वेळापत्रक जाणून घ्या.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून, दि. ३१.१२.२०२४ / १.१.२०२५ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२४ / १.१.२०२५ च्या मध्यरात्री कल्याण येथून ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२४ / १.१.२०२५ च्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि ०२.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२४ / १.१.२०२५ च्या मध्यरात्री पनवेल येथून ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.५० वाजता पोहोचेल.
या सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील.
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.