Celebrity Beauty Secrets : चमकदार त्वचेचे देसी सिक्रेट! महागड्या क्रीम्सची गरज नाही, 'या' घरगुती उपायाने मिळवा सेलिब्रिटींसारखा नॅचरल ग्लो

Shreya Maskar

सेलिब्रिटींसारखा ग्लो

तुम्हालाही जर सेलिब्रिटींसारखा ग्लो हवा असेल तर बेसन-दहीचा फेसपॅक आजच लावा. अनेक मुलाखतीत कलाकार याचे फायदे सांगतात. फेसपॅक बनवण्याचा आणि लावण्याची युनिक पद्धत जाणून घेऊयात. बेसन-दहीचा फेसपॅकचे चमत्कारी फायदे जाणून घेऊयात.

Glow like a celebrity | pinterest

त्वचा उजळण्यास मदत करते

जर तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग झाले असेल तर बेसन-दही फेस पॅक त्वचा उजळवण्यास मदत करतो. दह्यामधील लॅक्टिक ऍसिड मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. बेसन त्वचेला खोलवर स्वच्छ आणि शुद्ध करते.

Helps to brighten the skin | pinterest

मऊ त्वचा

दह्यामधील पोषक घटक त्वचा गुळगुळीत आणि स्वच्छ करण्यास मदत करतात. जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर हा फेस पॅक लावल्याने ती मऊ होईल. दही कोरडेपणा कमी करण्यास आणि त्वचेला आर्द्रता देण्यास मदत करते.

Soft skin | pinterest

हायड्रेटेड त्वचा

बेसन-दही फेस पॅक केवळ त्वचेचा रंगच सुधारणार नाही, तर तो त्वचा हायड्रेटेड देखील करतो. कधीकधी, धूळ किंवा इतर घटकांमुळे तुमचा चेहरा निस्तेज दिसू शकतो. अशा परिस्थितीत, हा फेस पॅक तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करेल.

Hydrated skin | pinterest

काळे डाग गायब

हा फेस पॅक नियमितपणे लावला, तर डाग आणि व्रण देखील हलके होतील. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड आणि दाहशामक गुणधर्म डाग, पिगमेंटेशन आणि वांग कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर, बेसनमधील घटक त्वचेला एक्सफोलिएट करतात.

Black spots disappear | pinterest

तेलकट त्वचेसाठीही उत्तम

तुमची त्वचा तेलकट असेल आणि नाक व हनुवटीभोवती तेल जमा होत असेल, तर बेसन-दह्याचा फेस पॅक वापरण्याचा विचार करा. हा पॅक लावल्याने अतिरिक्त तेल कमी होईल आणि तुमचा चेहरा टवटवीत दिसेल.

oily skin | pinterest

बेसन-दहीचा फेसपॅक

बेसन-दहीचा फेसपॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये बेसन, दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. १५ मिनिटे सुकू द्या आणि नंतर मसाज करून काढून टाका. चेहरा साध्या पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. तुम्ही हे आठवड्यातून १-२ वेळा लावू शकता.

Gram-yogurt face pack | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : "ये अदा है हँसी..."; प्राजक्ता माळीनं पूर्ण लूकच बदलला, फोटो पाहून चाहते झाले दिवाने

Prajakta Mali | SAAM TV
येथे क्लिक करा...