ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट बनवणारा सण. या सणाला बहीण भावाच्या हाताला राखी बांधून सदैव तिची रक्षा करण्याचे वचन घेते.
आता रक्षाबंधन जवळ आले आहे. बाजारात नवनवीन राख्या पहायला मिळतांयत. पण तुम्ही घरीच या युनिक DIY डिझाईन्सच्या राखी तयार करून तुमचे रक्षाबंधन आणखी खास बनवू शकता.
रंगेबीरंगी शायनी लेसच्या मदतीने एक फुल तयार करा. फुलाच्या मध्यभागी काही मोती लावा. एका धाग्यावर हे तयार झालेले सुंदर फुल चिकटवा.
तुमच्या आवडत्या रंगाचे ग्लिटर पेपर घ्या. त्याला फुलाच्या आकारात कापा. त्यावर मिरर किंवा सोनेरी रंगाचे बारीक मोती चिकटवा. तयार झालेल्या फुलामागे शायनी लेस लावा.
एका मोरपिसाला हव्या त्या आकारात कापून घ्या. त्याच्या कडेनी छान डायमंडची लेस आणि मणी लावा. त्यामागे धागा चिकटवा.
एक रंगीत कागद तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या. त्याच्या कडेनी एखादी सोनेरी रंगाची लेस लावा. त्यावर तुमच्या भावाचा फोटो चिकटवा. एका धाग्यात मणी ओवा व तो धागा राखीच्या मागे चिकटवा.
तुमच्या लहान भावासाठी तुम्ही कार्टून राखी बनवू शकता. यासाठी एका गोल आकाराच्या लहान कागदावर कोणत्याही कार्टूनचे चित्र काढा. त्यात तुम्हाला हवे ते रंग भरून राखी तयार करा.
काही रंगीत कागद घ्या. ते वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकारांचे कापून घ्या, स्केचपेनच्या मदतीने त्यावर कान, नाक, डोळे काढा. यानंतर ते एका धाग्यावर चिकटवा.