Dhanshri Shintre
अयोग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना डोळ्यांची दृष्टी आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास होतो.
काजू-बदाम महाग असल्यामुळे अनेकांना ते खाणे शक्य होत नाही, पण आज आम्ही एक स्वस्त आणि आरोग्यदायी पर्याय सांगणार आहोत.
देशात एक ठिकाण असे आहे जिथे तुम्ही फक्त ५० रुपये किलोने काजू खरेदी करू शकता, टोमॅटोपेक्षाही स्वस्त दरात!
झारखंडमधील जामतारा जिल्हा काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, जिथे मोठ्या प्रमाणात काजू लागवड होऊन स्वस्त आणि भरपूर सुकामेवा मिळतो.
जामताऱ्यातील नाला गावात ५० एकरावर काजू लागवड असून, प्रक्रिया नसल्यामुळे कच्चे काजू लवकर कमी किमतीत विकावे लागतात.
दिल्ली-एनसीआरमध्ये भाज्यांसारखेच जामतारामध्ये रस्त्यांवर काजू विकले जातात; कच्चा काजू ४५-५० आणि प्रक्रिया केलेला १५०-२०० रुपयांत मिळतो.
जामतारासोबतच संथाल परगणा आणि दुमका येथेही काजू शेती मोठ्या प्रमाणात आहे; शेतकरी कमी किमतीत विकून गरीब राहतात, तर एजंट नफा घेतात.