Saam Tv
1 लिटर दूध, 2 ब्रेड, १/२ वाटी गाजर सह केले गोड, १/२ वाटी दूध, ५ पिस्ता, ५ बदाम, साखर
सर्वप्रथम दूध उकळून घ्या. आता ब्रेडच्या कडा कापून घ्या आणि गाजर बारिक किसून घ्या.
आता तापलेल्या दूधातब्रेडचे तुकडे भिजवून घ्या.
किसलेले गाजर आता तव्यावर परतून घ्या. त्यात तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता.
दोन ते तीन मिनिटे गाजर परतल्यावर त्यात साखर घाला.
२ मिनिटात गॅस बंद करा. आणि गाजराचा रोल तयार करा.
तो रोल ब्रेडवर ठेवा आणि गाजर झाकत रोल तयार करा.
हा रोल तुम्ही फ्रिजमध्ये 10 मिनिटे ठेवा.
आता दूधात बदाम पिस्त्याचे तुकडे घालून घ्या. पुढे एका प्लेटमध्ये ते रोल घेऊन त्यावर हे दूध ओता. तयार आहे तुमची गाजर रसमलाई.