Shreya Maskar
गाजर कांजी बनवण्यासाठी काळे गाजर, बीटरूट, मोहरी, मीठ, लाल तिखट, हिंग, पाणी इत्यादी साहित्य लागते.
गाजर कांजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम गाजर आणि बीटरूट धुवून त्याचे तुकडे करा आणि गरम पाण्यात उकळून घ्या.
आता गाजर आणि बीटरूट काचेच्या बरणीत टाकून त्यात मोहरी, मीठ, हिंग आणि लाल तिखट घालून छान मिक्स करा.
आता ही बरणी त्यात थोडे गरम पाणी टाकून ४-५ दिवस उन्हात ठेवा.
रोज न विसरता ४ दिवस ही गाजर कांजी ढवळत रहा.
4 दिवसांनंतर तुमची गाजर कांजी तयार होईल.
ही कांजी नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणानंतर पिऊ शकता.
गाजर कांजी एक महिन्यांपर्यंत साठवून ठेवा येते.