ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल लहानमुलं जास्त प्रमाणात मोबाईल वापरताना दिसतात.
जास्त प्रमाणात मोबाईल वापरल्यामुळे तुमच्या डोळ्यांवर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
मोबाईलमधून निघणाऱ्या प्रकाशामुळे तुमच्या डोळ्यामधील रेटिना खराब होऊ शकतात.
मोबाईल प्रकाशामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा, अंधुक दडष्टी आणि डोकेदुखी सारख्या समस्या होतात.
मोबाईल वापरताना डोळा आणि मोबाईलमध्ये योग्य अंतर असणे गरजेचे आहे.
अनेकजण मोबाईल वापरताना डोळ्यापासून सुमारे ८ इंच अंतरावर ठेवतात ज्यामुळे तुमचे डोळे खराब होऊ शकतात.
मोबाईल वापरताना मोबाईल आणि डोळ्यांच्या अंतरामध्ये १२ ते २० सेंटिमिटरचा अंतर असावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.