Shreya Maskar
गाडी चालवताना गाडीचा कोणता भाग कधी बिघडेल हे सांगता येत नाही. अशात गाडीचे ब्रेक फेल झाल्यास घाबरून न जाता 'या' गोष्टी करा आणि गाडीतून सुखरूप बाहेर पडा.
गाडीचा ब्रेक फेल झाल्याचे समजता सर्वप्रथम गाडीचे इंजिन बंद करा. त्यामुळे गाडी हळूहळू थांबेल आणि तुमचा जीव वाचेल.
गाडीचे ब्रेक फेल झाल्यास गाडीच्या काचा उघडा. वाऱ्यामुळे गाडीचा वेग आपोआप कमी होईल.
गाडीचे ब्रेक फेल होताच गाडीतील एसी चालू करा. त्यामुळे इंजिनवरील दाब वाढेल आणि गाडीचा वेग कमी होण्यास मदत होईल.
गाडी चालवताना ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच गाडीचा वेग हळूहळू कमी करून एक्सीलेटरवरून पाय बाजूला घ्या आणि हँड ब्रेक लावा.
गाडीमध्ये असताना ब्रेक फेल झाल्यास गाडीचे गिअर्स काढा. त्यामुळे गाडीचा वेग कमी होईल. वेग कमी होताच तुम्ही गाडीतून उडी मारून आपला जीव वाचवू शकता.
गाडीचा ब्रेक फेल झाल्यावर रिव्हर्स गियर चुकूनही टाकू नका.
गाडीचा वेग जास्त असल्यास वरील सर्व प्रयत्नांनी वेग कमी करून स्टेअरिंगवर नियंत्रण मिळवा.
सपाट रस्त्यावर तुफान पळते. त्यामुळे गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच गाडी खडकाळ किंवा चखल असलेल्या रस्त्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. यामुळे गाडीची चाके चखलात रुतून बसतात.
ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.