ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकजण घरातील लहान मुलांनसोबत कारने प्रवास करत असतो.
पण या प्रवासादरम्यान लहान मुलांची खूप काळजी घ्यावी लागते
चला तर पाहूयात जर लहानमुलांसोबत कारने प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
कारमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करताना त्यांना सीट बेल्ट लावण्यास विसरु नये.
अनेकदा लहान मुल कारच्या खिडकीमधून बाहेर हात काढतात,त्यामुळे कारची खिडकीची काच बंद करुन ठेवावी.
कारमधून लहान मुलांसोबत प्रवास करताना लक्षात ठेवा की कारमध्ये चाइल्ड लॉक लावलेले असावे.
जर तुमचे मुल ४ ते६ वयोगटाली असले ,तर बाजारात त्यांच्यासाठी खास कारसाठी बनवलेल्या सीट्स उपलब्ध असतात.
कारमध्ये कायम लहान मुलांसाठी खाण्यापिण्याच्या जास्त गोष्टी सोबत घेऊन जावे.