Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

Surabhi Jayashree Jagdish

कमी वजन

वजन कमी करण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. आहारातून जास्त कॅलरी असलेले पदार्थ कमी केल्यास वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते. फळं आणि भाज्यांसोबतच कमी कॅलरी असलेल्या काही चटण्यांचाही आहारात समावेश करता येतो.

Healthy chutneys for weight loss | saam tv

कोथिंबीर-पुदिन्याची चटणी

बहुतेक घरांमध्ये सहज तयार केली जाणारी कोथिंबीर-पुदिन्याची चटणी वजन कमी करण्यास मदत करते. ही चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस लागतो.

Low calorie chutneys | saam tv

टोमॅटो-लसूण चटणी

टोमॅटोमध्ये पाणी आणि फायबरचं प्रमाण असल्याने वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त मानलं जातं. टोमॅटोमध्ये कॅलरी कमी असून त्यात अँटीऑक्सिडंट्सही असतात, तर त्यात लसूण घातल्याने चटणीची चव आणि गुणधर्म वाढतात.

Mint chutney for weight loss | saam tv

खोबरं-कढीपत्त्याची चटणी

नारळामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण असतं. कढीपत्ताही वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जात असल्याने नारळ आणि कढीपत्त्याची चटणी आहारात घेता येते.

Healthy Indian chutneys | saam tv

सफरचंद-दालचिनीची चटणी

दालचिनी हा स्वयंपाकघरात अनेक पदार्थांमध्ये वापरला जाणारा मसाला आहे. तो पदार्थांना वेगळी चव देतो. वजन कमी करण्यासाठी दालचिनीचा नियमित आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. दालचिनीची कडवट चव कमी करण्यासाठी सफरचंदासोबत त्याची चटणी तयार केली जाते.

Mango chutney for weight loss | saam tv

कैरी चटणी

कैरीमध्ये कॅलरी कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ही चटणी आहारात समाविष्ट करता येते आणि कच्चा आंबा मेटाबॉलिझम व्यवस्थित ठेवण्यास तसंच पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो.

Low calorie foods | saam tv

चटणी आहारात कशी समाविष्ट करावी?

या चटण्या घरच्या घरी तयार करून नेहमीच्या जेवणासोबत घेता येतात. कमी कॅलरी असलेल्या चटण्यांमुळे जेवणाची चव वाढवण्यासोबत आहारात फळं, भाज्या आणि इतर पौष्टिक घटकांचा समावेश करता येतो.

Coriander chutney benefits | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Tomato chutney benefits | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

Castor oil belly button | saam tv
येथे क्लिक करा