Manasvi Choudhary
कॅन्सरवरील केमोथेरपी उपचारादरम्यान शरीराची प्रकृती सुरळीत ठेवण्यासाठी आणि शरीराला उर्जा मिळण्यासाठी आहार अत्यंत महत्वाचा आहे. आहारामध्ये पचनासाठी उत्तम आणि पोषण तत्वांनी समृद्ध असे पदार्थ खाणे योग्य आहे.
कॅन्सरच्या केमोथेरपीदरम्यान तुम्ही खाऊ शकता असे कोणते पदार्थ आहेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
ओटमीलमध्ये कार्बोदके, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. ओट्समील खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते ज्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते.
अॅव्होकॅडो खाल्ल्याने शरीराला आवश्यक कॅलरीज आणि पोषण तत्वे मिळतात. तोंडाला येणारा कोरडेपणा, बद्धकोष्ठता आणि तोंडातील फोड अॅव्होकॅडो खाल्ल्याने कमी होतात.
अंडी हे हाय-क्वालिटी प्रोटीनचे पॉवरहाऊस आहे .अंडी खाल्ल्याने शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. थकवा दूर होण्यास मदत होते.
केमोथेरपी दरम्यान तोंडाला चव नसते अशावेळी तुम्ही विविध भाज्यांचे सूप प्या यामुळे तोंडाची चव बदलते. शरीराची पातळी टिकून राहते.
ड्रायफ्रुट्स हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. बदाम, अक्रोड हे ड्रायफ्रुट्स शरीरातील पेशींना नुकसाना पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये चरबी प्रथिने आणि व्हिटॅमिन ई हे पोषकघटक असतता जे शरीरावरची सूज कमी करतात. शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढवते.
ब्रोकोली खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी शरीरासाठी फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.