Blood Group: तुमचा ब्लड ग्रुप सांगू शकतो तुम्हाला कोणत्या आजारांचा आहे धोका?

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड ग्रुप आणि आजारांचा धोका

ब्लड ग्रुपच्या आधारे काही विशिष्ट आजारांचा संभाव्य धोका ओळखण्यास मदत होऊ शकते. एशियन हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिस्ट डॉ. उमा रानी यांच्या माहितीनुसार, विविध संशोधनांमध्ये वेगवेगळ्या ब्लड ग्रुपशी काही आजारांचा संबंध दिसून आला आहे.

Blood Type | saam tv

A ब्लड ग्रुपमध्ये स्ट्रोकचा धोका अधिक

संशोधनानुसार A ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये O ब्लड ग्रुपच्या तुलनेत स्ट्रोकचा धोका अधिक असू शकतो. यामागील एक कारण म्हणजे रक्तात गाठी (ब्लड क्लॉट्स) तयार होण्याची शक्यता जास्त असणे.

Stroke Risk | saam tv

AB ब्लड ग्रुप

AB ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅक आणि मेंदूशी संबंधित आजारांचा धोका तुलनेने जास्त असल्याचं काही अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आलंय. वाढत्या वयात या गटातील व्यक्तींमध्ये स्मरणशक्ती कमी होणं आणि डिमेन्शियाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी आणि मेंदूच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं.

AB Blood Group | saam tv

O ब्लड ग्रुपचे फायदे

O ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका तुलनेने कमी असल्याचं काही संशोधन सांगतं. मात्र या गटातील लोकांमध्ये पोटातील अल्सर होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असू शकते.

B Blood Group | saam tv

कॅन्सरचा धोका कोणत्या ब्लड ग्रुपमध्ये?

काही संशोधनांनुसार A आणि AB ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये पोटाचा आणि स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका तुलनेने अधिक असू शकतो. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला कॅन्सर होईल असं नाही. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी धूम्रपान टाळणं, संतुलित आहार घेणं आणि नियमित तपासणी करणं आवश्यक आहे.

Cardiovascular Disease | saam tv

ब्लड ग्रुपमुळे हा धोका का वाढतो?

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डियोलॉजीच्या माहितीनुसार, Non-O (A, B आणि AB) ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होऊ शकते. या व्यक्तींमध्ये रक्त गोठण्याशी संबंधित काही प्रथिनांचे प्रमाण तुलनेने जास्त असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता असते.

Stomach Cancer | saam tv

वेळोवेळी आरोग्य तपासणी

ब्लड ग्रुप हा फक्त आनुवंशिक घटक आहे आणि तो एकमेव जोखीम घटक नाही. हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा इतर गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं अधिक महत्त्वाचं आहे.

Pancreatic Cancer | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart Health | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Weight loss | saam tv
येथे क्लिक करा