Surabhi Jayashree Jagdish
चित्रपट पाहण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी डाउनलोड केलेले बनावट अॅप्स धोकादायक ठरू शकतात. अशा अॅप्सना SMS किंवा Notification ची परवानगी दिल्यास ते फोनवर येणारे OTP वाचू शकतात.
स्कॅमर्स पर्सनल माहिती चोरून तुमच्या मोबाईल नंबरवर नवीन SIM काढण्याचा प्रयत्न करतात. याला SIM स्वॅप फसवणूक म्हणतात. एकदा त्यांच्याकडे तुमचा नंबर गेल्यानंतर बँकेचे OTP आणि कॉल त्यांच्याकडे पोहोचू शकतात.
फसवे लोक स्वतःला बँक अधिकारी किंवा कस्टमर केअर प्रतिनिधी म्हणून ओळख देतात. ते AnyDesk, TeamViewer किंवा इतर Remote Access अॅपद्वारे स्क्रीन शेअर करण्यास सांगतात.
काही अॅप्स Notification Access ची परवानगी मागतात. ही परवानगी मिळाल्यानंतर त्या अॅप्सना फोनवर येणारे OTP आणि इतर संदेश वाचता येऊ शकतात. कोणत्याही अॅपला Notification Access देण्यापूर्वी त्याची तपासणा करणं आवश्यक आहे.
काही स्कॅमर्स फोनवर विशिष्ट USSD कोड डायल करण्यास सांगतात. असं केल्यास तुमचे कॉल त्यांच्या नंबरवर फॉरवर्ड होऊ शकतात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून फोनमध्ये कोड डायल करू नये.
रेल्वे स्थानक, एअरपोर्ट किंवा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेले सर्व Wi-Fi सुरक्षित असतातच असं नाही. काही वेळा स्कॅमर्स बनावट Wi-Fi नेटवर्क तयार करून युजर्सची माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात.
ऑनलाइन अनेक बनावट बँकिंग अॅप्स आणि फिशिंग वेबसाइट्स तयार केल्या जातात. त्यामध्ये लॉगिन आयडी, पासवर्ड किंवा इतर बँकिंग माहिती टाकल्यास ती थेट स्कॅमर्सकडे पोहोचू शकते.