कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Bharat Jadhav

मोठ्या आवाजात गाणी वाजवल्यानं याल अडचणीत

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान गाडीत आपण बऱ्याचदा गाणी ऐकत असतो.कार चालवताना गाणी वाजवण्यामुळे प्रवास सुखद वाटत असतो. मात्र, जर गाण्यांचा आवाज मोठा असेल आणि आवाज गाडीच्या बाहेर ऐकू येत असेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

Can you get a challan for playing loud music in your car in India

कारवाई होईल

मोठ्या आवाजात संगीत वाजवल्यामुळे केवळ आसपासच्या लोकांनाच त्रास होत नाही, तर काही विशिष्ट परिस्थितींमध्ये वाहतूक आणि ध्वनी-विषयक नियमांनुसार कारवाईही होऊ शकते.

Can you get a challan for playing loud music in your car in India

लक्ष विचलित होण्याची भीती

गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावल्याने वाहन चालवण्यावर परिणाम होऊ शकतो. मोठ्या आवाजातील संगीतामुळे चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित होऊ शकते.

Can you get a challan for playing loud music in your car in India

मोठ्या आवाजातील गाण्यामुळे अपघाताचा धोका

गाडीतील संगीताचा आवाज खूप जास्त असल्यास चालकाला जवळ येणाऱ्या वाहनांचे हॉर्न किंवा रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्यांचे सायरन ऐकू न येण्याची शक्यता असते. दुसऱ्या वाहनांचे हॉर्न ऐकू न आल्यास अपघात घडण्याची शक्यता असते.

Can you get a challan for playing loud music in your car in India

मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याने किती रुपयांचं चालान लागते?

मोठ्या आवाजात संगीत आणि ध्वनी प्रदूषणाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले तर विविध तरतुदींनुसार दंड आकारला जाऊ शकतो. 'मोटार वाहन कायदा' मधील कलम १९०(२) नुसार, ध्वनी प्रदूषण आणि रस्ते सुरक्षेच्या मानकांचे उल्लंघन केल्याच्या पहिल्या गुन्ह्यासाठी १,००० ते १०,००० रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.

Can you get a challan for playing loud music in your car in India

धोकादायक वाहन चालवल्यास कारवाई होते का?

जर मोठ्या आवाजातील संगीतामुळे चालकाचे लक्ष विचलित होत असेल आणि पोलिसांच्या मते वाहन चालवण्याची पद्धत धोकादायक असेन तर कलम १८४ अन्वये कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे, केवळ गाडीच्या आत संगीत वाजत आहे म्हणून पोलीस कारवाई करू शकत नाहीत

Can you get a challan for playing loud music in your car in India

हेही वाचा

येथे क्लिक करा

Diabetes: आजारपणात रक्तातील साखर वाढतेय? हे डायबिटीज होण्याचे संकेत असतात का?