ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या वातावरणामुळे चोहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवतात.
पिंपल्सच्या डागांमुळे चेहऱ्यावरील सुंदरता कमी होते.
चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी स्वयंपाकघरातील मोहरीचे तेल फायदेशीर ठरते.
मोहरीच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स आढळतात ज्यामुळे त्वचेवर बॅक्टिरियांची वाढ होत नाही.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मोहरीचे तेल लावल्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
चेहऱ्यावर मोहरीचे तेल लावल्यामुळे त्वचेवरील टॅनिंग निघून जाते.
चेहऱ्यावर नियमित मोहरीच्या तेलाचा वापर केल्यामुळे पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.