ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
या वर्षी 10 जून २०२५ रोजी वटपौर्णिमे आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घाआयुष्यासाठी उपवास ठेवतात.
या दिवशी सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत उपवास ठेवण्याचा नियम आहे.
या दिवशी महिला वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करतात.
ज्येष्ठ पौर्णिमा तिथी १० जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता सुरु होईल. ही पौर्णिमा ११ जून २०२५ रोजी दुपारी १. १३ वाजता संपेल. वटपूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ८.५२ ते दुपारी २.५ पर्यंत असेल.
अविवाहित मुली देखील वटपौर्णिमेचा उपवास ठेवू शकतात. परंतु यासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागते. हा उपवास केल्याने सौभाग्य प्राप्त होते.
या दिवशी अविवाहित मुलींनी स्नान करुन वडाच्या झाडाची पूजा करावी. यावेळी झाडाला दूध आणि पाणी अर्पण करा.
वटवृक्षाला ७, २१, ५१ किंवा १०८ वेळा प्रदक्षिणा घाला. यावेळी अविवाहित महिल निर्जला उपवास करु शकतात.