Stress Increase Diabetes: टेंशनमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते का? जाणून घ्या डायबिटीजच्या रूग्णांनी काय काळजी घ्यावी

Manasvi Choudhary

ताणतणाव

आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव प्रत्येकाच्या आयुष्याचा जणू एक भाग बनला आहे. कामाचा ताच, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा भविष्याची चिंता यामुळे अनेकजण सतत टेंशनमध्ये असतात.

Stress | pinterest

ताणतणावाचा आरोग्यावर होतो परिणाम

मात्र या ताणतणावमुळे केवळ मानसिक आरोग्य नाही तर शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. तुम्हाला जर डायबिटीज असेल तर ताणतणाव घातक ठरू शकतो.

Stress

डायबिटीजच्या रूग्णांसाठी घातक

ताणतणावामुळे आरोग्याचे नुकसान होते. तुम्हालाही जर डायबिटीजची समस्या असेल तर तुम्ही ताणतणावापासून दूर राहिले पाहिजे कारण ताणतणावामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Stress Increase Diabetes | pinterest

कॉर्टिसोल हार्मोन्सची पातळी वाढते

जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा अतिविचार करता किंवा तीव्र ताणतणावात असता, तेव्हा शरीराला अधिक ऊर्जेची गरज भासते. अशा वेळी शरीरात कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईन यांसारखे स्ट्रेस हार्मोन्स सक्रिय होतात. यामुळे शरीरात साठवलेले ग्लुकोज आणि फॅट्स थेट रक्तामध्ये सोडले जातात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते.

Increase in Cortisol Hormones | saam tv

रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम

डायबिटीज असलेल्या व्यक्तींना ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणे कठीण असते त्यात मानसिक ताणतणावामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अचानक वाढते यामुळे मधुमेहींनी आरोग्याची काळजी घ्या.

Blood Sugar Level

इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते

जर तुम्ही दीर्घकाळ ताणतणावामध्ये किंवा नैराश्यात असाल, तर शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊ लागते. यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते.

Insulin Resistance

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Family Photo Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणत्या भिंतीवर फॅमिली फोटो लावू नये?

Family Photo Vastu Tips
येथे क्लिक करा..