International Day of Yoga 2025: रात्री शांत झोप येत नाही? ही ५ योगासनं करा आणि शांत झोप घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झोपेच्या समस्या

झोपेच्या समस्यांवर मात करण्यासाठी योगासने खूप प्रभावी ठरू शकतात

योगा

योगा हे शरीर आणि मन शांत करण्यास मदत करतात. चांगली झोप येण्यासाठी कोणता योगा करू शकतो ते पाहूयात.

शवासन

हे आसन झोपेच्या समस्यांवर प्रभावी मानलं जातं. या आसनात पाठीवर सरळ झोपून, हात आणि पाय सैल सोडून शरीराला पूर्णपणे आराम दिला जातो. हे मन शांत करते, ताण कमी करतं.

बालासन

हे आसन मज्जासंस्थेला शांत करते आणि तणाव कमी करण्यास मदत करते. गुडघे दुमडून त्यावर नितंब ठेवून पुढे वाकून कपाळ जमिनीला टेकवले जाते. हे आसन पाठ आणि खांद्यावरील ताण कमी करून आराम देते.

विपरीत करणी

या आसनात भिंतीचा आधार घेऊन पाय वर केले जातात. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, थकवा आणि तणाव कमी होतो. हे आसन मन शांत करून झोपेसाठी शरीर तयार करते.

बद्धकोनासन

हे आसन मांड्या, हिप्स आणि गुडघ्यांमध्ये लवचिकता आणते. दिवसभराच्या थकव्यामुळे आलेला ताण कमी करून शारीरिक आणि मानसिक विश्रांती देते, ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

भ्रामरी प्राणायाम

हे आसन नसले तरी हा एक महत्त्वाचा श्वासोच्छ्वास व्यायाम आहे, जो झोपेच्या समस्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे मन शांत होते, तणाव कमी होतो आणि चांगली झोप येण्यास मदत होते.

Goregaon Tourism: लांब जायची गरजच नाही, पावसाळ्यात गोरेगावमध्येच या शांत ठिकाणी एका दिवसात फिरून या

येथे क्लिक करा