Surabhi Jayashree Jagdish
कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे, जी शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते.
दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे होतो, विशेषतः जेव्हा त्याचं निदान उशीरा होतं.
अनेकदा लोकांना तेव्हा समजतं जेव्हा कॅन्सर लास्ट स्टेजमध्ये पोहोचलेला असतो. कॅन्सरची लास्ट स्टेज म्हणजे असा टप्पा, जेव्हा कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो.
पहिल्या टप्प्यात कॅन्सरचे उपचार सोपे असतात आणि पूर्ण बरे होण्याची शक्यता जास्त असते, परंतु शेवटच्या टप्प्यात उपचार करणे कठीण होते.
तर अशा वेळी प्रश्न पडतो की, कॅन्सरचा उपचार शेवटच्या टप्प्यातही होऊ शकतो का?
कॅन्सरचे उपचार शेवटच्या टप्प्यातही होऊ शकतात आणि अनेक प्रकरणांमध्ये शेवटच्या टप्प्यातील रुग्णही बरे झाले आहेत.
अनेकदा शेवटच्या टप्प्यात सीआरएस आणि एचआयपीईसीसारख्या मोठ्या शस्त्रक्रियांद्वारे उपचार केले गेले आणि रुग्णांना या जीवघेण्या आजारातून वाचवण्यात आले आहे.
सीआरएसमध्ये शरीरातील सर्व कर्करोग पेशी काढून टाकल्या जातात. एचआयपीईसी शस्त्रक्रियेत पोटाच्या आत गरम कीमोथेरपी औषध टाकले जाते.